संशयास्पद शैलीमुळे सेनानायकेच्या गोलंदाजीवर बंदी

senanayke
कार्डीफ – आयसीसीने श्रीलंकेचा गोलंदाज सचित्रा सेनानायकेच्या गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याचे जाणवले होते त्यानंतर त्याच्या गोलंदाजीची चाचणी घेण्यात आली आणि त्याची शैली योग्य नसल्याचे आढळून आल्याने त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

३१ मे रोजी लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात पंचांनी आपल्या सामना अहवालामध्ये सेनानायकेच्या संशयास्पद गोलंदाजीचा उल्लेख केला होता. कार्डीफमध्ये त्याच्या गोलंदाजीच्या शैलीची चाचणी घेण्यात आली आणि चेंडू टाकताना १५ डिग्रीपेक्षा अधिक कोन साधत असल्याचे आढळून आले. येत्या दोन आठवडय़ामध्ये सेनानायकेला आयसीसीला अधिकृत नोटीस पाठविण्याशिवाय दुसरे गत्यंतर राहणार नाही.

Leave a Comment