राष्ट्रवादीला चार दिवसात पडणार मोठे भगदाड – घोरपडे

ajit
सांगली – माजी मंत्री अजितराव घोरपडेंनी पुढील चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडणार असून, पडलेले भगदाड कसे बुजवायचे असा प्रश्न पक्षाला पडेल? असा दावा केला आहे.

सांगली जिल्ह्यातल्या सावळज इथल्या जाहीर सभेत ते बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अवास्तव विश्वास ठेवून एकच नेते वाढवले, त्यामुळे खासदारांची संख्या चारवर आली, अशी टीकाही केली आहे.

तर दुसरीकडे औरंगाबादेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा आहे. अनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पक्षाचे अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा महत्वाचा मानला जातोय. पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकणे आणि जोमाने कामाला लागावेत हा या मेळाव्याचा उद्देश आहे.

Leave a Comment