मोदी सरकारचा रिलायन्सला दणका

mukesh-ambani
नवी दिल्ली : अंबानी -अदानी यांचेच सरकार या अपप्रचाराला सामोरे जाणाऱ्या मोदी सरकारने रिलायन्सला तब्बल ३५०० कोटींचा दंड ठोठावून अलिप्त असल्याचे अप्रत्यक्ष दाखवून दिले आहे.

मोदी सरकारने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 3500 कोटींचा अतिरिक्त दंड ठोठावला आहे. पेट्रोलीयम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ही माहिती संसदेत दिली.रिलायन्सने कृष्णा –गोदावरी खोऱ्यातील ब्लॉकमधून निर्धारीत लक्षापेक्षा कमी नैसर्गिक वायूचे उत्पादन केल्याप्रकऱणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या चार वर्षात रिलायन्सने उत्पादनाचे निर्धारित लक्ष्य न गाठल्याने त्यांच्यावर गेल्या चार वर्षांचा एकत्रित दंड दोन अब्ज डॉलर्स इतका झाल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. रिलायन्सने केलेल्या आत्तापर्यंतच्या उत्खननाच्या बदली सराकार जी रक्कम रिलायन्सला देणे लागतो, ती रक्कम रिलायन्स न देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. रिलायन्सला ठोठावलेल्या दंडाची रक्कम सरकार अशा पद्धतीने वसूल करणार आहे.

Leave a Comment