मुंबई – केंद्रीय निवडणुक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रात आक्टोबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचे निरीक्षण करण्यासाठी दोन दिवसांच्या दौर्यावर येत असल्याचे समजते. मुख्य निवडणूक आयोग अध्यक्ष व्ही.एस. संपथ हेही महाराष्ट्रात येत असून त्यांच्या सोबत आयुक्त एम.एस ब्रह्म आणि एसएनए झैदी हेही आहेत.
निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या दौर्यावर
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणुक आयोगाचे हे वरीष्ठ आयुक्त महाराष्ट्रातील राज्य व जिल्हा पातळीवरील वरीष्ठ प्रशासकीय अधिकार्यांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहेत. त्यात निवडणुका घेण्यासंबंधीची तयारी कुठपर्यंत झाली आहे याचा आढावा घेतला जाणार आहे तसेच मतदार याद्यांसंबंधीहीची माहिती घेतली जाणार आहे असे समजते.