ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांना सेनेत थारा नाही : उद्धव ठाकरे

udhav
मुंबई – शिवसेनेची दारे शिवसेना प्रमुख हयातीत असताना ज्यांनी त्रास दिला त्यांना कायमची बंद झाली आहेत, त्यांना शिवसेनेत कदापि थारा दिला जाणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना ठणकावले.

सोमवारी शिवसेनेत समता परिषदेचे नेते किशोर कान्हेरे यांनी प्रवेश केला. ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जारेदार चर्चा राजकीय वतुळात सुरू आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, येत्या ऑगस्टमध्ये कोकणातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

Leave a Comment