रायपूर – छत्तीसगड सरकारने मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होती. आता यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात शिक्षण खात्याने आदेश जारी केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये सध्या २०८ महाविद्यालये असून यामध्ये सुमारे ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सरकारच्या निर्णयाचा लाभ या विद्यार्थिनींना होणार आहे. अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनींना वार्षिक १८ हजार रुपये फीसुद्धा माफ केली जाणार असल्याचे छत्तीसगड शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.