इटली – ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च गुरू पोप फ्रान्सिस यांनी जगभरातल्या पाद्रींपैकी किमान 2 टक्के पाद्री चर्चमधल्या बालकांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
चर्चमधील पाद्री करत आहेत लैंगिक शोषण – पोप
फ्रान्सिस यांनी इटली मधील एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला असून पाद्रींकडून चर्चमधल्या बालकांचे केले जाणारे लैंगिक शोषण हा एक संसर्गजन्य रोग असून, त्याचे वेळीच निराकरण करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, फ्रान्सिस यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.