ऑस्ट्रेलियात चमकला अमित मिश्रा

amit-mishra
ब्रिस्बेन – ब्रिस्बेन येथे सुरू झालेल्या दुसऱया अनधिकृत कसोटीत दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात ७ बाद २८८ धावा केल्या असून, जेम्स फॉकनेर आणि पिटर फॉरेस्ट यांनी शानदार अर्धशतके झळकविली आहेत. भारत अ तर्फे अमित मिश्राने ४ तर उमेश यादवने ३ गडी बाद केले.

या सामान्यात ऑस्ट्रेलिया अ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यादवच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया अ च्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. एकवेळ त्यांची स्थिती ३ बाद ६४ अशी नाजूक झाली असताना चौथ्या गडय़ासाठी कर्णधार फॉकनेर आणि फॉरेस्ट या जोडीने १३३ धावांची भागीदारी केली. फॉरेस्टने १३ चौकारांसह ७७ धावा जमविल्या. केवळ ६ धावांनी फॉकनेरचे शतक हुकले. त्याने १४८ चेंडूंत ४ षटकार आणि १० चौकारांसह ९४ धावा जमविल्या. फॉकनेर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया अ ने आणखी दोन गडी गमविले. मार्शने १४ तर व्हाईटमनने १२ धावा केल्या. कटिंग २३ तर बॉईस १ धावांवर खेळत होता. अमित मिश्राने ११४ धावांत ४ तर उमेश यादवने ४२ धावांत ३ गडी बाद केले.

Leave a Comment