बगदाद : बगदाद येथील २७ वारांगणांची इराकमधील हिंसाचारादरम्यान दहशतवाद्यांनी गोळया झाडून निर्घूण हत्या करण्यात केली आहे. जायना भागातील एका मशीदीजवळ असलेल्या अपार्टमेन्टमध्ये हा नरसंहार घडला.
इराकमध्ये २७ वारांगणांची हत्या
दोन बहुसंख्य बंदुकधारी दहशतवादी गट दोन अपार्टमेन्टमध्ये घुसले. त्यांनी सायलेंस लावलेल्या बंदुकीने २७ वारांगणांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली असून हे हत्याकांड आयएसआयएस किंवा शिया मलिशिया या दहशतवादी संघटनांपैकी कोणी घडवून आणले, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या हत्याकांडामागे इराकमध्ये वेश्या व्यवसायावर बंदी असल्याचे धार्मिक कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.