77 दहशतवाद्यांना कंठस्नान

afgan
काबूल : 77 तालिबानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानात लष्करी कारवाईत खात्मा करण्यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लगमान, गजनी आणि हेलमंड प्रांतातल्या काही भागात अफगाण नॅशनल आर्मीने गेल्या 24 तासात लष्करी कारवाई करीत 77 सशस्त्र दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर काही दहशतवादी जखमी झाले आहेत. लष्कराने शस्त्रात्रे व दारूगोळा जप्त केला आहे. तसेच रस्त्यांलगत पेरलेले सुरूंग व बॉम्ब निकामी केले आहेत. कारवाई दरम्यान रस्त्यालगत झालेल्या बॉम्ब स्फोटात 3 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment