प्रक्रिया उद्योगाने क्रांती शक्य

gahi
आपल्या देशामध्ये १९६० च्या दशकात हरित क्रांती झाली. या हरित क्रांतीने शेतकरी सुखी होईल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या. परंतु शेतकरी त्यामुळे सुखी झाला नाही. हरित क्रांतीमध्ये गहू आणि तांदूळ या पिकांचे उत्पादन खूप वाढले. त्यानंतर भाजीपाला, ङ्गळे यांच्या उत्पादनामध्ये खूप वाढ झाली. नवनवी बियाणी आली. संकरित जाती आल्या. ङ्गळबागायतीत वाढ झाली. महाराष्ट्र तर या बाबतीत ङ्गार आघाडीवर आहे. मात्र ही सगळी प्रगती होऊन सुद्धा शेतकरी म्हणावा तेवढा स्वाभीमानी आणि स्वावलंबी होऊ शकला नाही. हरित क्रांतीने जे घडले नाही ते प्रक्रिया क्रांतीने घडू शकेल. भारतातले उद्योजक आणि कारखानदार शेतकर्‍यांकडे कच्च्या मालाचा पुरवठा करणारा घटक म्हणून पाहतात आणि कोणताही उद्योजक अधिक ङ्गायदा व्हावा यासाठी कच्चा माल स्वस्तात स्वस्त घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी निव्वळ कच्चा माल तयार न करता आपल्या शेतात तयार होणार्‍या उत्पादनातून काही पक्का माल तयार होऊ शकतो का, याचा विचार केला पाहिजे. तर मग तो श्रीमंत होऊ शकेल.

जगात कॅलिङ्गोर्निया, इस्रायल, ब्राझील या देशांतही ङ्गलोद्याने खूप आहेत पण त्यांच्यात आणि आपल्यात एक ङ्गरक आहे. ते शेतकरी आपली ताजी ङ्गळे बाजारात नेऊन विकत नाहीत. त्यातली ङ्गार तर दहा टक्के ङ्गळे ते बाजारात नेऊन विकतात. ९० टक्के ङ्गळांवर ते काही ना काही प्रक्रिया करतात आणि त्यातून तयार झालेले पदार्थच ते बाजारात विकतात. त्यांना अशा पदार्थांपोटी ङ्गळांपेक्षा कितीतरी जादा पैसा मिळत असतो. तो किती जादा असतो हे आपण अनेक उदाहरणांवरून पहात आहोत आणि पाहिले नसेल तर अजूनही पाहू शकतो. मँगो पल्प हे उदाहरण तर आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. आपल्याच चार ते पाच आंब्याचा रस काढून तो बाटलीत भरला जातो आणि तो बाजारात १०० रुपयांपेक्षाही अधिक किंमतीला विकला जातो. सध्या आपण बाजारात पाच ते दहा रुपयांना ङ्गळांचे रस प्यायला लागलो आहोत. स्ट्रॉबेरी पासून ते सीताङ्गळापर्यंत अनेक ङ्गळांचे रस त्यात असतात.

ङ्गळाच्या एखाद्या ङ्गोडीएवढा रस, थोडे दूध आणि बराचसा बर्ङ्ग असा तो रस दहा रुपयांना रस्त्यावरच्या ज्यूस सेंटर मध्ये विकला जायला लागला आहे. या विक्रीत बराच ङ्गायदा असल्यामुळे अशा ज्युस सेंटरचे पेव ङ्गुटल्यागत झाले आहे.
सहा रुपयांना हा ज्युस विकून त्यांना ङ्गायदा होतो मग चांगल्या हॉटेलांत तोच ज्यूस मिल्क शेक या नावाने ३५ ते ५० रुपयांना विकला जातो त्यात त्यांचा किती ङ्गायदा होत असेल याचा अंदाज आपण करू शकतो. असेच उद्योग शेतकर्‍यांनी का करू नयेत ? असा प्रश्‍न पडतोे. केल्यास काय होते याचे एक उदाहरण देणार आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य सर्वांना माहीत आहे. पूर्ण थंड हवा आणि डोंगराळ प्रदेश हे या राज्याचे वैशिष्ट्य. डोंगराळ जमीन म्हणजे आपल्या भाषेत दुष्काळी प्रदेश आणि दुष्काळी प्रदेश म्हणजे गरिबी. तिथलेही शेतकरी तसेच समजत होते. जोपर्यंत ते मका पिकवत होते तोपर्यंत ते तसेच समजत होते पण, त्यांना एके दिवशी साक्षात्कार झाला की, आपल्या हवामानात सङ्गरचंदे चांगली येतात. कारण आपली हवा आणि जमीन काश्मीर सारखी आहे. तेव्हा त्यांनी मक्याची कास सोडून सङ्गरचंद लावायला सुरूवात केली. सङ्गरचंदातून त्यांना चांगला पैसा मिळायला लागला पण त्याच्या या शेतीत काही प्रश्‍न निर्माण झाले.झाडांना लागणार्‍या सङ्गरचंदांपैकी २५ टक्क्यांपेक्षाही अधिक संङ्गरचंदे खाली पडून, मार लागून किंवा इतर काही कारणांनी साल केवळ साल खराब झाल्यामुळे उकिरड्यावर टाकून देण्याची पाळी आली.

ही समस्या कशी सोडवावी यावर त्यांनी विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या ङ्गळांची ङ्गक्त साल खराब झाली आहे. गराला काही झालेले नाही. मग गर वापरून काही करता येईल का ? या ङ्गळांची साल काढून टाकली आणि गराचा रस काढला तर काय हरकत आहे ? असा विचार करून त्यांनी रस काढला आणि तो ताजा रस टँकरमध्ये भरून देशातल्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर विक्रीला पाठवला. गंमतीचा भाग असा की, त्यांच्या चांगल्या सङ्गरचंदांपेक्षा उकिरड्यावर टाकलेल्या ङ्गळांचे जादा पैसे मिळायला लागले कारण चहाचा छोटा कप भरून ज्यूस दहा रुपयांना विकला जात असतो. रस काढून तो विकण्याच्या या युक्तीमुळे हिमाचल प्रदेशाच्या शेतकर्‍यांचे उत्पन्न एवढे वाढले की, पूर्वी मागासलेले समजले गेलेले हे राज्य आता देेशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. त्याचा क्रमांक पंजाबच्या खालोखाल आहे. दरडोई उत्पन्नात हिमाचल प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आपण असे काही का करीत नाही ? काही करत नाही तोपर्यंत आपल्याला हिमाचल प्रदेशाची बरोबरी करता येणार नाही. हिमाचल प्रदेशातला सङ्गरचंदाचा ज्यूस महाराष्ट्रात येऊन विकला जातो पण महाराष्ट्रातला डाळिंबाचा ज्यूस आपल्या इतर राज्यात तर सोडाच पण महाराष्ट्रात सुद्धा विकला जात नाही. आपण नुसतेच नसा ताणून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणत बसतो.

Leave a Comment