दारूची नशा आणि शारीरिक वासना यात साम्य

alcohol
वॉशिंग्टन – भारतामध्ये बलात्कारांचे आणि विशेषत: सामूहिक बलात्काराचे प्रकार वाढत चालल्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पण दुसर्‍या बाजूला बलात्कार करण्यास प्रवृत्त होणारे कामांध लोक तसे का प्रवृत्त होतात यावर मानसशास्त्रज्ञ काही संशोधन करत आहेत. एखादी व्यक्ती कामपिसाट होते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये कोणते बदल होतात आणि कोणत्या प्रक्रिया चालतात याचा ते अभ्यास करत आहेत.

अमेरिकेतही असाच अभ्यास सुरू असताना असे दिसून आले की, दारूच्या आहारी गेलेला एखादा व्यसनी माणूस आणि कामपिसाट व्यक्ती या दोघांच्याही मेंदूत होणारे बदल सारखेच असतात. हे संशोधन करणारे संशोधक डॉ. व्हॅलरी वून यांनी यासाठी २० लोकांची निरीक्षणे नोंदली. लहान वयातच कामभावना प्रदिप्त करणार्‍या पोर्नोग्रॅफिक साईटस् पाहणारी मुले स्वत:च्या कामभावना नियंत्रित करू शकत नाहीत आणि त्यांच्या हातून लैंगिक गुन्हे घडतात.

दारू पिणारा व्यक्ती आणि बलात्कार करणारा तरुण या दोघांच्याही अंतर्मनामध्ये आपण हे करता कामा नये अशी एक जाणीव असते. परंतु दारूचे दुकान दिसले की, मद्यपी व्यक्तीच्या मनातील दारू पिण्याची भावना बलवत्तर व्हायला लागते आणि नकळतपणे त्याच्या मनातली ती जाणीव लोप पावून त्याची पावले दारूच्या दुकानाकडे वळतात. तशीच गत कामपिसाट तरुणाची होते. त्याच्या मनावर त्याचा ताबा रहात नाही. मद्यपीची पावले दारूच्या गुत्त्याकडे वळताना त्याच्या मेंदूत जे बदल होतात तेच बदल या कामपिसाट तरुणाच्या मनात होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment