संगणक … आता माऊसला नवा पर्याय

mouse
आता असे एक उपकरण आले आहे, जे माउसवरील अवलंबित्व कमी करू शकते. बोटांत परिधान करता येणार्‍या या उपकरणाचा आकार माउसच्या तुलनेत अतिशय छोटा आहे. ६0च्या दशकात माउसचा शोध लागल्यापासून ते संगणकावर काम करण्यासाठी अतिशय गरजेचे साधन बनले आहे. अर्थात माउसच्या वापरामुळे द्विमीतिय हालचालींपर्यंतच आपण मर्यादित राहतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्योमिंगमधील अँन नुएन आणि अँमी बॅनिक यांनी हे नवे इंटेलिजंट उपकरण तयार केले आहे. हे उपकरण थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे अचूक स्थिती ओळखते. जवळपास सगळ्य़ाच संगणकीय उपकरणांसाठी युनिव्हर्सल इनपूटचे काम करू शकेल, असे एका स्वस्त साधन बनविण्याचा हेतू समोर ठेवून नुएन आणि बॅनिक यांनी हा माउस विकसित केला आहे. तो छोटा व कुठेही घेऊन जाता येण्याजोगा असावा अशी त्यांची इच्छा होती. या उपकरणाचा थ्रीडी टच बोटाच्या टोकावर असतो, त्यात थ्रीडी अँक्सेलरोमीटर, एक थ्रीडी मॅग्नटॉमीटर आणि थ्रीडी जायरेस्कोप आहे. प्रत्येक सेन्सरद्वारे डाटा घेऊन त्याची तुलना केली जाते आणि या सगळ्य़ातून जो परिणाम मिळतो, तो सर्वात जास्त अचूक असतो. थ्रीडी टचमध्ये असलेला एक ऑप्टिकल सेन्सर एखाद्या माउसप्रमाणेच द्विमीतिय पृष्ठभागावर उपकरणाच्या हालचालींची नोंद घेतो. त्याचे हे काम माउसपेक्षा कितीतरी सरस ठरू शकते. सध्या हे उपकरण तारांद्वारे एक कंट्रोलरसोबत जोडलेले असून ते सगळ्य़ा सेन्सरकडून डाटा घेतो. त्यानतंर डाटाला लॅपटॉपमध्ये पाठविले जाते. आणखी सुधारणा करून तारा काढून ते वायरलेस बनविले जाऊ शकते.

Leave a Comment