रोजा सोडताना किरूनातील मुस्लीम अडचणीत

sweden
सध्या जगभरात जेथे जेथे मुस्लीम बांधव आहेत तेथे रमजानचे रोजे सुरू आहेत. रमजान हा मुस्लीमांचा पवित्र महिना. या महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कांहीही न खाता पिता उपवास केला जातो त्याला रोजा म्हणतात. सूर्यास्तानंतर इफ्तारची वेळ असते व तेव्हा उपास सोडला जातो. स्वीडनमधील किरूना येथील मुस्लीमांना मात्र इफ्तारची वेळ कशी ठरवायची असे संकट पडले आहे. कारण येथे सूर्यास्त होतच नाहीये. या भागात साधारण पणे ७०० मुस्लीमांनी रोजे पाळले आहेत. अर्थात हे सारे मुस्लीम बाहेरच्या प्रांतातून येऊन येथे स्थायिक झालेले आहेत.

दक्षिण आणि उत्तर ध्रुवाच्या परिसरात सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस अशी परिस्थिती असते हे आपण जाणतो. कांही ठिकाणी दिवस मोठा व रात्र छोटी असेही असते. स्कैंडिव्हीयाच्या भागात सध्या सूर्यास्त होतच नाहीये. या भागात धार्मिक संस्थेशी संलग्न अशी एखादी अधिकारी संस्था नाही. यामुळे या भागातील मुस्लीम नागरिकांना इफ्तारची वेळ नक्की ठरविणे अवघड बनले असून अनेकांनी २२-२३ तास उपवास ठेवला आहे. २६ मे ते १६ जुलै या काळात येथे चंद्राचे दर्शन होणार नाही. पूर्ण दिवस सूर्यच असेल तर १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात सूर्य दिसणार नाही. हे वेळापत्रक दरवर्षी बदलते असेही समजते.

Leave a Comment