मुलांचे लोकेशन सांगेल किडस ऑन घड्याळ

lg
आपला पाल्य कुठे असेल, घरी कधी येणार याची काळजी पालकांना नेहमीच वाटते. त्यावर मुलांशी सतत संपर्कात रहाता यावे म्हणून मुलांकडे मोबाईल फोन देण्याचा एक मार्ग आहे. मात्र या सवलतीचा मुले गैरवापर करण्याची भीतीही पालकांना वाटत असते. एल जी इलेक्ट्रोनिक्सने पालकांना मुलांचा ठावठिकाणा कळावा यासाठी किडस ऑन हे मनगटी घड्याळासारखे उपकरण बाजारात आणले आहे. १० जुलैला ते कोरियात उपलब्ध करण्यात आले असून त्यानंतर ते युरोप व उत्तर अमेरिकेच्या बाजारात आणले जाणार आहे. घड्याळाची किमत अजून जाहीर केली गेलेली नाही.

या आधुनिक घड्याळामुळे मुलांचे लोकेशन पालकांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर कळू शकणार आहे. मनगटावर बांधायचे हे ट्रेंडी घड्याळ निळा, गुलाबी आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे. अर्थात मुलांचे ठावठिकाण कळण्यासाठी जीपीएस व वायफायची सुविधा असलेला मोबाईल पालकांकडे असणे गरजेचे आहे. या घड्याळात लोकेशन रिमांयडर व वन स्टेप कॉल फिचर दिल्या गेल्या आहेत. तसेच या घड्याळात १ नंबर सेव्ह करता येतो ज्यामुळे मुले अडचणीत असतील तर पालकांशी या नंबरवर संपर्क साधू शकतात अथवा पालकही कॉल केला व मुलांनी तो १० सेकंदात घेतला नाही तर आपोआप कॉल कनेक्ट होतो व लाऊडस्पीकरच्या सहायाने मुलाचा आवाज पालक ऐकू शकतात.

या घड्याळात जो नंबर सेव्ह करायचा तो कोणत्याही स्मार्टफोन व टॅब्लेटशी डिव्हाईस कनेक्ट करताना वेळोवेळी बदलता येतो. टूजी थ्रीजी सपोर्ट यासाठी दिला गेला असून घड्याळाची बॅटरी सतत ३६ तास चालते. बॅटरी उतरली तर पालकांना अॅलर्ट मेसेज येतो.

Leave a Comment