‘तिथे’ मृतदेहाचे दफन नाही कि अग्निही नाही …

dafan
इजिप्तमधील ममींबाबत आपण नेहमीच ऐकतो, पण पापुआ न्यू गिनीच्या मोरोबेमधील अंगा आदिवासी प्रजातसुद्धा आपल्या अनोख्या ममीकरणासाठी चर्चित आहे. तिथे मृतदेहांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रथम ते आगीत किंचीत होरपळवले जातात. त्यानंतर ते कबरीमध्ये दफन करण्याऐवजी डोंगरांच्या कडांवर ठेवून दिले जाते. लाल रंगात रंगवून ठेवलेले हे मृतदेह गावातूनही दिसतात. डोंगरावर बांबूच्या आधाराने उभे केलेले हे मृतदेह अतिशय विचित्र दिसतात, पण अंगा प्रजातीच्या लोकांसाठी मृत व्यक्तीचा सन्मान करण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे. मृतदेहांवर लेप देण्याचे काम अतिशय सावधगिरीने एखाद्या अनुभवी व्यक्तीद्वारे केले जाते. सुरुवातीस गुडघे, खांदे आणि पायांना योग्य आकार देण्यासाठी संपूण चरबी हटवली जाते. त्यानंतर तो बांबूच्या सांगाड्यावर ठेवला जातो. यादरम्यान मृतदेहातून काढलेली चरबी मृताचे नातलग आपले केस व त्वचेवर लावतात. यामुळे मृताची ताकद जिवंत व्यक्तीत येते असे समजले जाते. त्यानंतर मृतदेह सडू नये यासाठी त्याचे डोळे, तोंड व पार्श्‍वभाग काढला जातो. अशी ममी शेकडो वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवली जाऊ शकते, असे हे लोक सांगतात. सडण्याची शक्यता असलेले जीभ, तळव्यापासून सगळे अवयव काढून घेतले जातात. त्यानंतर उरलेला मृतदेह आगीवर भाजला जातो. हा मृतदेह नैसर्गिक रुपात शेकडो वर्षे संरक्षित राहण्यासाठी त्यावर नंतर लाल रंगाचा लेप लावला जातो. एखाद्या खास प्रसंगी डोंगरावर ठेवलेल्या या ममी अंगा आदिवासी गावामध्येसुद्धा आणतात.

Leave a Comment