चीनची बुलेट ट्रेन तोट्यात

china
चीनच्या हायस्पीड रेल्वे नेटवर्क विकासाबद्दल जगभरात कितीही चर्चा केली जात असली तरी चीनमधील बुलेट ट्रेन सातत्याने तोट्यात चालत असल्याचे समजते. यामुळे चीन सरकारने हायस्पीड रेल नेटवर्कचा विस्तार सध्या तरी करू नये असा सल्ला तेथील तज्ञ देत आहेत. कारण हे नेटवर्क अधिक विस्तारले तर देशाचे मोठे नुकसान होईल असे या तज्ञांचे म्हणणे आहे.

बिजिंगच्या जियाटोंग विद्यापीठातील प्रोफेसर जिओ जिआन सांगतात, नुकसानीत चालत असलेल्या बुलेट ट्रेनवर जादा पैसा खर्च करणे हे शहाणपण नाही. त्याऐवजी सरकारने नियमित रेल्व नेटवर्क विकासावर अधिक खर्च करायला हवा. बिजिग शांघाय या दरम्यान चालविली जात असलेली बुलेट ट्रेन सतत तोट्यात असून त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. कारण या मार्गावरील विमान प्रवास रेल्वेपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे हायस्पीड रेल्वे नेटवर्क विस्तार करताना या बाबीही लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत.

भारतानेही नुकतीच अहमदाबाद मुंबई मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली असून त्यासाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाबाबतही देशातील तज्ञ ही योजना किती फायद्याची ठरेल याविषयी साशंक आहेत.

Leave a Comment