चक्क पाण्यावर तरंगणारा गोल्फ रिसॉर्ट

golf
अमेरिकेच्या इडोलमधील एक गोल्फ कोर्स सरोवराच्या मध्यभागी चक्क पाण्यावर तरंगणारा आहे. क्लबच्या नावावरूनच या गोल्फ कोर्सचे ‘लेक कोयूर डी-अँलन’ असे नामकरण करण्यात आले आहे. १५ हजार चौरस क्षेत्रफळाचा हा तरंगता गोल्फ कोर्स हिरवळीने भरलेला आणि छोट्या छोट्या रोपट्यांच्या तटबंदीसह पाच झाडांनी घेरलेला अहे. त्याची अशा प्रकारे रचना करण्यात आली आहे की, खेळाडूच्या क्षमतेनुसार, त्यांचे सेटिंग केले जाऊ शकते. तिथे पुरुष खेळाडूंसाठी ११0 ते २१0 यार्ड, तर महिलांसाठी ६५ ते १३0 यार्डची रेंज उपलब्ध करून दिली जाते. त्याच्या या हालचाली संगणकाद्वारे नियंत्रित केल्या जातात. या गोल्फ कोर्सला एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाण्यासाटी पाण्यामध्ये लोखंडाची तारांचे एक जाळे आहे. त्याच्या मदतीने त्यास सरकविले जाते. गोल्फ कोर्सवर खेळताना त्याच्या तंगरणार्‍या बेटावर बनलेल्या १४व्या होलमध्ये चेंडू खेळण्याची इच्छा असेल तर तुम्हाला अचूक शॉट मारण्यासाठी आधीच खात्री करून घ्यावी लागते. हा गोल्फ कोर्स जगातील सर्वोत्तम गोल्फ रिसॉर्ट म्हणूनही ओळखले जाते. या गोल्फे कोर्सचे प्रमुख अँडी मॅक्किमी यांनी सांगितले की, १४ वा गोल जेवढे जोखमीचे आहे, तेवढेच आव्हानात्मकसुद्धा. या बेटासारख्या गोल्फ कोर्सवर यशस्वी व अचूकपणे चेंडू टोलवणारा हिरो ठरतो. तिथे दरवर्षी हजारो चेंडू पाण्यात मारणार्‍यांची बरीच मोठी यादी तयार होईल.

Leave a Comment