गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणूक जाहीर करण्याची मागणी

vidhan-sabha
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर दुसरीकडे गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधूमीचा रंग गणेशोत्सवावर चढू नये यासाठी विधानसभा निवडणुका गणेशोत्सवानंतर जाहीर करण्याची मागणी होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि अनेक गणेश मंडळांने विधानसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर जाहीर करण्याची मागणी करताना म्हटले की, गणेशोत्सवावर राजकीय रंग चढू नये. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी निवडणुका जाहीर करण्याची घाई करू नयेत. 29 ऑगस्टला गणेश चतुर्थीदिवशी गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे.

Leave a Comment