कर्ज न फेडल्याने बॅंकेकडून विनोद कांबळींची जाहिरात प्रसिद्ध

vinod
मुंबई – मुंबईतील डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेचे (डीएनएसबी) कर्ज थकविल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळी याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

कांबळी यांनी अनेक वर्षे झाल्याने आणि वारंवार कर्जाची भरावे अशी विनंती करूनही परतफेड न केल्याने अखेर बॅंकेने आज यासंबंधित जाहिरात दिली आहे. विनोद कांबळी यांचा कर्जदार व त्यांची पत्नी अँड्रिया ही सहकर्जदार असल्याचे जाहिरातीत प्रसिद्ध केले आहे. तसेच बॅंकेने त्यांच्याविरोधात सर्व प्रकारची कायदेशीर कारवाई सुरु केलेली आहे असे जाहीर केले आहे. याचबरोबर विनोद व त्यांची पत्नी यांच्या मालमत्तेसंबंधित कोणाला काही असल्यास बॅँक व्यवस्थापनास कळवावे असे बँकेने आवाहन केले आहे.

विनोद कांबळी यांनी डीएनएसबी बॅंकेचे किती व कधी कर्ज घेतले याबाबत मात्र माहिती जाहीरातीत देण्यात आली नाही. तसेच हे कर्ज कोणत्या प्रकारातील आहे याचाही तपशील देण्यात आला नाही. समजा बॅँकेने होम लोन दिले असते तर बॅंकेने फ्लॅट, घर लिलावात काढले असते. मात्र, विनोद यांनी घेतलेले हे लोन एक तर व्यावसायासाठी किंवा पर्सनल लोन घेतले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनोद यांची मालमत्ता माहित असल्यास कळवावे असे बॅंकेने म्हटले आहे.

Leave a Comment