कर्जबाजारी झाली एमटीएनएल, बीएसएनएल

bsnl
नवी दिल्ली – 21 हजार कोटींवर पोहोचले आहे एमटीएनएल आणि बीएसएनएल कंपन्यांचे कर्ज. जून 2014 रोजी संपलेल्या तिमाही आकडेवारीमध्ये ही कर्जवाढ दिसून आल्यामुळे सध्या या दोन्ही कंपन्या आर्थिक संकटात अडकल्या आहेत. राज्य सरकारच्यावतीने एमटीएनएल चालवण्यात येते. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती देताना सांगितले की हे संकट दूर करण्यासाठी एमटीएनएल बीएसएनएलमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत आणि गेल्या 31 मार्च 2012 अखेर 12,983 कोटी कर्ज होते. यामध्ये बीएसएनएलचे 3335 तर एमटीएनएलचे 9648 कोटी कर्ज असल्याचे त्यांनी सांगतिले. 31 मार्च 2014 मध्ये हा आकडा अनुक्रमे 5948 आणि 14210 इतका झाला. तर जूनअखेर हेच कर्ज 6448 आणि 14760 कोटी इतके वाढले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. वाढत्या कर्जाच्या बोजामुळे या दोन्ही कंपन्यांवर आर्थिक संकट वाढले आहे. केंद्र सरकार या दोन्ही कंपन्यांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीविविध उपाय योजना आखण्यात येत आहेत. नव्याने 39,458 कोटींची गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. यामुळे येत्या पाच वर्षात त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

Leave a Comment