अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला पुन्हा आक्षेप

ajit-pawar
पिंपरी-चिंचवड – अनधिकृत बांधकामधारकांकडून आकारण्यात येणाऱ्या शास्तीकरामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्र्याच्या हातात असतो. असा टोला हाणत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या 13 प्रकल्पांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, माझ्या हातात असते तर शास्तीकर वसुलीला स्थगिती देऊन मोकळा झालो असतो. नागरिकांनी शास्तीकर भरू नये, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी महापालिका सभेत केले होते. त्याबाबत अजितदादांना छेडले असता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरच हल्ला चढवला.
राष्ट्रवादीच्या खात्यांशी संबंधित विषयांवर तातडीने निर्णय घेतले जातात, मात्र नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्या खात्याशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे, असे सांगत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला.

Leave a Comment