६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरला जपान

japan
टोकियो – शनिवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने जपानचा पूर्व भाग हादरला. समुद्रात या भूकंपामुळे २० सेटींमीटर उंचीच्या त्सुनामीच्या छोटया लाटाही उसळल्या. मात्र यामुळे किनारपट्टीवर कुठलेही नुकसान झाले नसल्याचे जपानच्या अधिका-यांनी सांगितले.

हा भूकंप फुकूशिमा अणूऊर्जा प्रकल्पा जवळ झाला असला तरी, त्यामुळे अणूऊर्जा प्रकल्पाला कोणताही धोका निर्माण झाला नसल्याचे जपानच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. जपानमध्ये २०११ मध्ये भूकंपानंतर उसळलेल्या त्सुनामीच्या लाटांमध्ये पूर्वकिनारपट्टीवर मोठया प्रमाणावर जिवीत व वित्तहानी झाली होती. फुकूशिमा प्रकल्पातून किरणोस्तर्गाची गळती झाली होती.

१९८६ साली युक्रेनमधील चर्नोबेल अणू भट्टीला झालेल्या अपघातानंतरचा हा दुसरा मोठा अणूभट्टीचा अपघात ठरला होता. त्सुनामीचा इशारा जारी झाल्यानंतर किनारपट्टीवर रहाणा-या शहरांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र त्सुनामीचा इशारा मागे घेतल्यानंतर हे आदेश रद्द करण्यात आले.

Leave a Comment