१५ ऑगस्टपर्यंत जाहीर होणार महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी – देवेंद्र फडणवीस

devendra
पुणे – विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या पाच जिल्ह्यातील आढावा घेण्यात आला. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व विभागात जाऊन तेथील सर्व जिल्ह्याच्या स्वतंत्र बैठका घेऊन मतदारसंघाची माहिती घेऊन स्थानिक नेत्यांशी संवाद साधला जात आहे. आज पुण्यात प्रदेश भाजपच्या नेत्यांसह बैठक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर सांगितले की, महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी 15 ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, रविंद्र भुसारी यांच्या कोअर कमिटीने माहिती घेतली. तसेच संभाव्य उमेदवार कोण असावेत याबाबत चाचपणी केली. याचबरोबर इतर पक्षांतील कोणत्या-कोणत्या नेत्यांना चुचकारायचे व बाहेरील नेत्यांस पक्षात घेतल्यास काय फायदे-तोटे होतील याबाबत स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली.

आज पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित सांगली, सोलापूर, कोल्हापूर व सातारा अशा पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यासाठी तास-दीड वेळ ठेवण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक नेते काय मत नोंदवतात ती पक्ष नोंदवून घेतली. कोअर कमिटीच्या सदस्यांशिवाय या त्या- त्या भागातील खासदार-आमदार, प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नेत्यांच्या माहितीच्या नोंदी टिपून, जिल्हाध्यक्ष त्याचा स्वतंत्रपणे अहवाल प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करतील.

Leave a Comment