शिवसेनेच्या वाटेवर छगन भुजबळ?

bhujbal
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तपत्राने भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी छापली असून यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भुजबळ यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे.

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता धुसुर असल्याने भुजबळ यांनी प्रथम भाजपात जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो सफल न झाल्याने त्यांनी शिवसेनेच्या दिशेने पाऊल टाकल्याचे या बातमीत म्हटले आहे. तसेच यासाठी आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनीही मध्यस्थी बातमीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या सर्व वृत्ताचा छगन भुजबळ यांनी मात्र इन्कार केल्याचे समजते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी मुद्दाम अशा अफवा पसरवत असल्याचे सांगत आपला राष्ट्रवादी सोडण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment