‘मोबाईलमुळे बलात्कार ,शाळा-महाविद्यालयांत बंदी हवी’

mobile
बंगळुरु – मोबाइल फोनच्या सर्रास वापरामुळे बलात्कार आणि विनयभंग यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये मोबाइल फोनवर बंदी घालण्यात यावी. अशाप्रकारची शिफारस कर्नाटक विधानसभेच्या एका समितीने सरकारकडे केली आहे.

महिला आणि बालकल्याण समितीने आपला अहवाल विधानसभेत सादर केला. मात्र त्यात म्हटले आहे कि , ज्या मुली ‘मिस्ड’ कॉलचे उत्तर देतात, त्या बऱ्याचदा अडचणीत सापडताना दिसून येतात . अशा अनेक घटना समोर आल्या आहेत की, ज्यामध्ये अनेकदा मुलींना निर्जनस्थळी बोलाविण्यासाठी मोबाइल फोनचा वापर होतो. तसेच मोबाइलमुळे शाळा आणि महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडत आहे.आमदार शकुंतला शेट्टी या समितीच्या अध्यक्षा असून त्यांनी आपल्या अहवालात असे निष्कर्ष मांडले आहेत. शिवाय या अहवालाच्या आधारावर समितीने शाळा आणि महाविद्यालयात मोबाइलवर बंदीची शिफारस केली आहे. या शिफारसीमुळे कर्नाटक सरकावर अनेक स्तरातून टीका होत आहे.

Leave a Comment