माझा मुलगा रॉकेट नाही- राज ठाकरे

rajthakeray
मुंबई – लाँच करायला माझा मुलगा रॉकेट नाही. योग्य वेळ येताच तो राजकारणात येईल. प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मनसेच्या युथ विंगच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. गेले काही दिवस राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित चुलतभाऊ आदित्य ठाकरे यांच्या प्रमाणे युथ विंगच्या प्लॅटफॉर्मवरून राजकारणात येणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमातून केली जात होती. त्याला उद्देशून राज बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की युथ विंग हे अमितच्या राजकारण प्रवेशासाठी लाँच पॅड असल्याचे बोलले जात आहे. पण लाँच करायला अमित रॉकेट नाही. प्रसारमाध्यमांवर फार विश्वास ठेवू नका. या वेळी बोलताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोशल मिडीया व तंत्रज्ञानाचा वापर अति करू नका असे सांगतानाच सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करा असाही सल्ला दिला. भाजप व मोदींनी सोशल मिडीयाचा वापर निवडणूक प्रचारासाठी जोरदार केला पण आता लोकांचा त्यांच्याबाबतीत भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सोशल मिडीयात आता चार्म राहिलेला नाही हे ध्यानात घ्या असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment