प्रीती – नेस वाडिया यांच्यात वाद; पण कधी ?साक्षीदारामुळे पोलिस चक्रावले

priety
मुंबई – मागील अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उद्योजक नेस वाडिया यांच्यात सुरू असलेल्या वादाचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश मिळणे कठीण बनले असले तरी साक्षीदाराच्या साक्षीमुळे तेही चक्रावले आहेत.

या प्रकरणातील एका साक्षीदार महिलेने तर आपल्या हजेरीत प्रीती व नेस यांच्यात कोणताही वाद न घडल्याची साक्ष नोंदवली आहे. त्यामुळे प्रीती-नेस वादाचे नेमके चित्र अद्यापि स्पष्ट झालेले नाही.

प्रीतीने एकेकाळचा प्रियकर असलेल्या नेस वाडिया यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यामुळे खळबळ माजली आहे. आरोपाचे गांभीर्य विचारात घेऊन मरिन ड्राईव्ह पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात साक्ष नोंदवण्यासाठी प्रीतीने काही साक्षीदारांची यादी दिली आहे, तर नेस वाडिया यांनी नावे दिलेल्या नऊ साक्षीदारांचेही जबाब नोंदवले जात आहेत. वाडिया यांनी यादी दिलेल्या साक्षीदारांपैकी एका साक्षीदार महिलेने आपल्या हजेरीत प्रीती व वाडिया यांच्यात कोणतीही बाचाबाची न झाल्याचे तपासकर्त्यांना सांगितले, असे पोलीस सूत्रांकडून समजते. प्रीती व वाडिया यांच्यात वाद झाल्याचे दिसले नाही किंवा त्यांच्यात बाचाबाची झाल्याचेही ऐकले नाही, असे साक्षीदार पूजा दादलानी यांनी तपासकर्त्या पोलीस अधिकार्‍यांपुढे सांगितले. पूजा यांनी उभय पक्षकारांपैकी कोणा एकाची बाजू न घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment