जपान फुकुशिमा भागात भूकंप- त्सुनामीचा इशारा

japan
जपानच्या फुकुशिमा भागातील किनारपट्टीवर पहाटे जोरदार भूकंप झाला असून या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी मोजली गेली आहे. समुद्राच्या तळाशी १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिदू असून या भूकंपामुळे पुन्हा त्सुनामी येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

टोकियोच्या उत्तरपूर्वेकडे फुकुशिमा प्रांतातील नमी जवळ हा भूकंप झाला असून फुकुशिमा येथील दाईची अणूप्रकल्पाचे या भूकंपामुळे किती नुकसान झाले याची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.२०११ साली याच परिसरात झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये १९ हजार जपानी नागरिक मरण पावले आहेत. या भूकंपामुळे फुकुशिमा अणूवीज केंद्राचे प्रचंड नुकसान झाले होते तसेच तेथून अद्यापीही रेडिएशन होत असल्याने या भागातील १ लाख नागरिक अद्यापीही आपल्या घरी परतू शकलेले नाहीत.

Leave a Comment