चीनी नागरिकांना पुन्हा गुगल सेवेचा लाभ

google
गेल्या १ महिन्यापासून चीनी सरकारने निर्बंध आणलेली गुगलची सेवा देशात पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेला महिनाभर गुगलच्या सर्च इंजिन, मॅप, ईमेल सेवा चीनमध्ये बंद होत्या. मात्र गुगल सेवा सुरू झाली असली तरी फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब . याहूची फोटो शेअरिंग साईट, फ्लिकर, मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह क्लाऊड स्टोरेज या सेवांवर गेले वर्षभर चिनी सरकारने बंदी आणली असून या सेवा अद्यापीही सुरू झालेल्या नाहीत.

येथील तिआनमेन चौकात २५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनाचा पाडाव करण्यासाठी चीन सरकारने जमावावर गोळीबार केला होता व त्यात अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. यंदा या घटनेला २५ वर्षे होत आहेत.त्या निमित्ताने पुन्हा एकदा या चौकात निदर्शने केली जाणार होती. त्याला अटकाव करण्यासाठी चीन सरकारने सोशल साईट व इंटरनेटवर निर्बंध आणले असल्याचे सांगितले जात आहे. इंटरनेटवर बंदी घातल्याने नागरिकांना परस्परांशी संपर्कात राहाता येऊ नये यासाठी हा मार्ग सरकारने स्वीकारला असल्याचे समजते. सध्या गुगलवरील बंदी मागे घेतली असली तरी ती किती काळाकरता याविषयी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

चीनी सरकारचे इंटरनेट वापरावर पूर्ण नियंत्रण आहे. दक्षिण कोरियाच्या काकाओ कॉर्प च्या मोबाईल मेसेज अॅप, कामाओ टॉक यावरही आठवड्यापूर्वीपासून सरकारने बंदी घातली आहे.

Leave a Comment