जेरुसलेम – सलग पाचव्या दिवशीही इस्त्रायलकडून गाझापट्टीत सुरु असलेले बॉम्ब हल्ले सुरुच आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १२१ ठार झाले आहेत.
गाझापट्टीत बॉम्ब हल्ले सुरुच, १२१ ठार
शनिवारी इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्यात १६ जण ठार झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. शुक्रवारपर्यंत झालेल्या हल्ल्यात १०० जण ठार झाले होते. दरम्यान, गाझापट्टीतील आणखी नव्या ६० ठिकाणी हल्ले करणार असल्याचे इस्त्रायलने म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे.
या हल्ल्यात ठार झालेल्यापैकी ७७ टक्के हे सामान्य नागरीक असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.