सोने पुन्हा झळकले

gold
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने पुन्हा उसळी घेतली असून हे भाव औंसाला १३४० डॉलर्सवर झेपावले आहेत. त्यातच भारतात कालच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात कर कमी न झाल्याने देशातही सोन्याचे भाव उसळले असून येत्या कांही महिन्यात सोने पुन्हा ३० हजारांची पातळी गाठेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

मोदी सरकारकडून सोन्यावरील आयात शुल्कात घट केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळे गेले कांही दिवस देशात सोन्याचे भाव उतरणीच्या मार्गावर होते. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. त्यातच मध्यपूर्वेतील तणावामुळे पुन्हा एकदा गुंतवणुकदार सोन्याकडे वळले आहेत. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय दरांवर झाल्याने तेथे भाव वाढले आहेत. परिणामी भारतातही कांही काळ सोन्याचे दर उतरत असल्याचे दिसले तरी लवकरच ते पुन्हा १० ग्रॅमला ३० ते ३१ हजारांची पातळी गाठतील असे कोटक कमोडिटीचे धर्मश भाटिया यांचे मत आहे.

Leave a Comment