सॅमसंगचा गॅलॅक्सी के झूम भारतात आला

zoom
सिंगापूर इव्हेंटमध्ये २४ एप्रिलला सादर करण्यात आलेल्या द.कोरियन जायंट सॅमसंगचा गॅलेक्सी के झूम स्मार्टफोन आता भारतातही उपलब्ध झाला असून त्याची किंमत आहे २९९९९ रूपये. अॅमेझॉन इंडिया वेबसाईटवर तसेच सॅमसंग इंडिया स्टोअर्समध्ये हा फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

काळा, निळा आणि पांढरा अशा तीन रंगात हा स्माटफोन मिळणार आहे व त्याची शिपमेंट ९ जुलैपासूनच सुरू झाली आहे. गतवर्षी कंपनीने लाँच केलेल्या गॅलेक्सी एक्स झूमचे हे व्हेरिएंट आहे. ४.८ इंचाचा स्क्रीन, १० एक्स झूम फिचरचा २०.७ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड किटकॅट ४.४, सेल्फी अलार्म फिचर अशी त्याची वैशिष्ठ्ये असून ८ जीबीची इंटरनल मेमरी ६४ जीबीपर्यंत मेमरी कार्डने वाढविता येणार आहे. या स्मार्टफोनची जाडी केवळ २० मिमी आहे आणि त्याचे वजन आहे २०० ग्राम.

Leave a Comment