सव्वा टन सोने जप्त

gold
नवी दिल्ली – महसूल शोध महानिदेशनालय आणि सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये देशभरामध्ये वर्षभरात सव्वा टन म्हणजेच १२६७ किलो सोने जप्त केल्याची माहिती राज्यसभेमध्ये देण्यात आली. वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीमारमण यांनी एका लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली. २०११ मध्ये १५३.२६ किलो सोने जप्त केले होते. २०१२ मध्ये २००.७५ किलो सोने जप्त केले आहे. सोने तस्करीबाबतची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. २०१३-१४मध्ये ६७०.४१ टन तर २०१२-१३ साली एक टन सोने जप्त केले होते.

Leave a Comment