
समलैंगिकांचे समर्थन करण्यासाठी अॅपलने आपला नवा लोगो प्राईड मुव्हमेंटमध्ये सादर केला आहे. अॅपलच्या पूर्वीच्या लोगोच्या आकाराचा आणि डिझाइनचा हा लोगो इंद्रधनुष्याच्या रंगात सादर केला गेला आहे. गे प्राईड मुव्हमेंटमध्ये लाँच केलेल्या या लोगोची व्हीडीओ फित जारी करण्यात आली आहे.
समलैंगिकांना पाठिंब्यासाठी अॅपलचा नवा लोगो
या व्हिडीओत अॅपलचे हजारो कर्मचारी सायकल परेडमध्ये लोगोसह दिसत असून या परेडसाठी अॅपलच्या म्युनिच, पंरिस, हाँगकाँग येथील कार्यालयातील कर्मचारीही उपस्थित होते असे समजते. हे कर्मचारी अॅपल टी शर्ट घालून रंगीबेरंगी झेंडे फडकवित सायकल परेड करत होते. या परेडमध्ये अॅपलचे सीईओ टीम कुक यांचीही झलक दाखविली गेली.
