मोबाईल बॅटरीसाठी आता चक्क वाळूचा वापर

mobile
आजकाल भरमसाठ फंक्शन असलेले स्मार्टफोन व टॅबलेट्सचा एवढा वापर वाढला आहे की, त्यांना रोजच्या रोज चार्ज करून घ्यावे लागते. मात्र ही उपकरणे चार्ज करण्याची रोजची आता कटकट लवकरच दूर होणार आहे. वाळूवर आधारित नव्या बॅटरीमुळे हे शक्य होणार अहे. शास्त्रज्ञांनी लिथिमय आयनाची एक बॅटरी विकसित करण्यासाठी चक्क वाळूचा वापर करून घेतला आहे. ही बॅटरी सध्याच्या मानक तत्त्वांच्या तुलनेत तीनपटीने जास्त सरस आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील इंजिनियरिंगचे प्राध्यापक केंजिज ओजकान आणि मिहरी ओजकान यांच्यासोबत या योजनेवर काम करत असलेली पदवीचा विद्यार्थी जाकारी फेवर्स याने सांगितले की, ही कर्मी खर्चिक, बिनविषारी आणि पर्यावरणास अनुकूल लिथियम आयन बॅटरी अँनोड बनविण्याची पद्धत आहे. सध्या अँनोडसाठी ग्रॅफाइट जगभर सर्वत्रच वापरले जाते, मात्र इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दिवसेंदिवस जास्त शक्तिशाली होत असल्याने ग्रॅफाइटमध्ये सुधारणा करण्याची क्षमता जवळपास संपुष्टात आली आहे. म्हणूनच ग्रॅफाइटच्या जागी अता नॅनोस्केलवर सिलिकॉनचा वापर करण्यावर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात त्यातही अडचणी आहेत. नॅनोस्केल सिलिकॉन लवकर खराब होतात आणि त्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेणेही कठीण आहे. अर्थात काहीही असले तर वाळूवर संशोधन करत शास्त्रज्ञांनी या दिशेने आशेचा नवा किरण दाखविला आहे.

Leave a Comment