पुणे स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय ऍलर्ट

pune-bomb
मुंबई – दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय ऍलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर गुरूवारी एका दुचाकीमध्ये स्फोट झाला. यात एका पोलीस हवालदारासह चार जण जखमी झाले. यामागे इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यभरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबईत हाय ऍलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

स्फोटाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला असून, त्यांच्याकडून सर्व शक्याशक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. गणेशोत्सव दीड महिनांवर येऊन ठेपला असतानाच हा स्फोट घडविण्यात आल्याने यामागच्या सूत्रधारांना पकडण्याचे सुरक्षा यंत्रणांपुढे आव्हान आहे.

Leave a Comment