पगारासाठी गावस्कर यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

sunil-gavaskar
नवी दिल्ली – बीसीसीआयकडून आपल्याला वेतन मिळावे अशी मागणी घेऊन हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी पगारासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाने २८ मे रोजी गावस्कर यांची नियुक्ती केली होती. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांचे अडकल्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून हटवम्यात आले होते व त्यांच्याऐवजी गावस्कर यांची निवड करण्यात आली होती. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे सातवे पर्व दुबई व भारतात यशस्वीरित्या पार पडले.

दरम्यान, सेवानिवृत्त न्यायाधीश मुकुल मुद्गल यांच्या अध्यक्षेतेखाली आयपीएल स्पॉटफिकसिंग प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. मुद्गल यांच्या नेतृत्वाखालील समिती याप्रकरणी १३ महत्वाच्या व्यक्तींची चौकशी करत आहे.

Leave a Comment