जळगाव व्ही.जी.पाटील हत्या प्रकरण: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू अडचणीत

partibha-patil
जळगाव – जिल्हा सत्र न्यायालयाने आज जळगाव जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील खून खटल्यात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू जी.एन.पाटील यांना सहआरोपी करत १५ जुलैला जळगाव न्यायालयाने या दोघांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जळगाव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी.पाटील यांची सकाळी सकाळी २१ सप्टेंबर २००५ रोजी राज्यात काँग्रेसचे राज्य असतांना हत्या झाली होती. या हत्येतील प्रमुख आरोपी राजू माळी (मयत), राजू सोनावणे यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.

राजकीय वैमान्यासातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू जी.एन. पाटील यांच्या सागण्यावरून ही हत्या झाल्याचा आरोप व्ही.जी.पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील या करत होत्या.

जिल्हा सत्र न्यायालयाने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू

जी.एन.पाटील यांना सहआरोपी केल्या मुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. डॉ.पाटील आणि जी.एन.पाटील यांना या खटल्यात आरोपी करण्यात आल्याने आरोपींची संख्या ४ झाली आहे. त्यातील राजू माळी हा आरोपी या आधीच (एप्रिल २००७) मरण पावला आहे.

विशेष म्हणजे नार्को टेस्ट मध्ये सुद्धा या आरोपींनी माजी खासदार पाटील आणि राष्ट्रपतींच्या बंधुच्या नावाचा दुजोरा दिला असल्याच रजनी पाटील याचं म्हणणं आहे. आज या प्रकरणात जलगाव सत्र न्यायालयाने डॉक्टर उल्हास पाटील आणि डॉक्टर जी एन पाटील यांना १५ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोघांपुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

Leave a Comment