गुरुजनांच्या ज्ञानाने आयुष्य परिपक्व :सुनील तटकरे

pune
पुणे :’ गुरूंचे स्थान आयुष्यात दीपस्तंभाप्रमाणे असते ,नवीन पिढीने गुरुजनांचे ज्ञान घेत आयुष्यात परिपक्व होत जावे ‘ असे उदगार राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले .

गुरु पौर्णिमेनिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने गुरुजनांचा गौरव करण्यात आला . त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने सुनील तटकरे बोलत होते . डॉ . ह वि सरदेसाई ,सुरेश तळवलकर ,बी आर खेडकर ,अर्नवाझ दमानिया ,आबा शिंदे या गुरुजनांचा गुरूपौर्णिमेनिमित्त तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

तटकरे म्हणाले ,’ आपल्या अवती भोवती विविध क्षेत्रात तज्ञ मान्यवर असतात . इंटरनेट आणि अन्य माध्यमातून माहिती मिळत असली तरी खडतर परिश्रमातून ज्ञान मिळवून आपल्याला देणाऱ्या गुरुजनांची सर त्या माहितीला येत नाही . गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानामुळे विचारधारेला तात्विक बळ येते . गुरुपौर्णिमा हा दिशा देणारा उत्सव आहे , या दिवसापासून थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करावे .,विचारांचे अधिष्ठान पुढे न्यावे . ‘ राष्ट्रवादी कॉंग्रेस हा राजकारणाबरोबर समाजकारणात देखील तत्वप्रणालीने कार्यरत आहे ,असे या कार्यक्रमातून दिसते ,प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पुण्यातील पहिल्याच कार्यक्रमात गुरुजनांना वंदन करण्याचे भाग्य लाभले ‘ असेही ते म्हणाले . अप्पा रेणुसे ,नगरसेवक विशाल तांबे ,अभय मांढरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले

Leave a Comment