सप्टेंबर अखेरीस तयार होणार हायस्पीड रेल्वेचे डबे

railwar-coach
कपूरथला – रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर लगेचच कपूरथला येथील रेल्वे कोच फॅक्टरीने आपली रेल्वे कोच कंपनी ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणाऱया रेल्वेच्या क्षमतेच्या डब्यांचा पहिला संच सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडय़ात तयार करु शकते, असे सांगितले आहे. हे डबे जलदगतीने रुळावरुन धावण्याच्या क्षमतेचे होतील. सस्पेंशन, ब्रेकिंगप्रणाली तसेच दरवाजांमध्ये बदल करण्यासाठी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) समवेत विचारविमर्श करेल, असे आरसीएफचे महाव्यवस्थापक प्रमोद कुमार यांनी सांगितले.

ज्या मार्गांवरुन जलदगती गाडय़ा धावणार आहेत ते आठ ते दहा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. प्रथम या निवडक मार्गांवरुन ताशी १६० किलोमीटर वेगाने गाडय़ा धावतील नंतर हा वेग ताशी 200 किमीपर्यंत वाढविण्यात येईल.

Leave a Comment