शीख दंगलप्रकरणी अमेरिकी कोर्टाचा निकाल, सुनावणीस दिला नकार

sonia1
वॉशिंग्टन : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात भारतात झालेल्या शीख दंगलीप्रकरणी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस अमेरिकी कोर्टाने नकार दिला आहे.

ही याचिका अमेरिकी शीख संघटना (एसएफजे) यांच्यावतीने दाखल करण्यात आली होती. १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगली प्रकरणी सोनिया गांधी यांच्या विरोधात खटला चालवून त्यांना शिक्षा करण्याची मागणी या संघटनेने केली होती. गेल्या महिन्यात या विषयी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान गांधी यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment