बिजिंग – हुनानमध्ये शालेय बसला झालेल्या अपघातानंतर ही बस एका जलाशयात पडून ११ जणांचा मृत्यू झाला.
शालेय बसला जलसमाधी; ११ जणांचा मृत्यू
चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, गुरूवारी दुपारी शियांगटान शहराजळील पर्वतरांगांमधील रस्त्यावरून विद्यार्थांना घेऊन जाणारी एक शालेय बस पलटी होऊन जवळच्या जलाशयात कोसळली. या अपघातात बसमधून प्रवास करणाऱया सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात 8 विद्यार्थी व दोन शिक्षकांचा समावेश आहे.