पॅरिस – देशभरातील प्रेमिकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपोलियन बोनापार्ट आणि जोसेफीन यांच्या विवाह प्रमाणपत्राचा लवकरच लिलाव होणार आहे.
लिलाव ‘नेपोलियन’च्या विवाह प्रमाणपत्राचा
८ मार्च १७९६ साली नेपोलियन आणि जोसेफीन यांच्या विवाहाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. या प्रमाणपत्रावर नेपोलियन आणि त्याची पत्नी जोसेफीन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दुसऱ्याच दिवशी त्यांचा विवाह झाला होता. या विवाहाचे अधिकृत नोंदणीकरण १८ मार्चला पॅरिस येथे करण्यात आले होते.
नेपोलियन हा युद्धनीतीत तरबेज होता. शौर्य व पराक्रमाच्या जोरावर अवघे जग कवेत घेणारा हा शूर सेनानी मनानेही तितकाच हळवा होता. जोसफीनवर त्याचे जीवापाड प्रेम होते.