राहुल गांधी ‘हाजीर हो’

rahulgandhi
ठाणे – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपवर पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणाऱ्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कोर्टाने समन्स बजावले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येवरून राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

भिवंडीतील कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले आहे. इतकंच नाही तर राहुल गांधींना 7 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहाण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, भिवंडीमध्ये काँग्रेसने राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रचारसभा घेतली होती. यावेळी आरएसएसच्या लोकांनीच महात्मा गांधींची हत्या केली असे विधान राहुल गांधींनी केले होते .

राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात आरएसएसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानुसार राजेश कुंटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.यावरूनच न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले आहे.

Leave a Comment