जगातील सर्वात उंच मुलगी

highest
सफरानबोलू – जगातील सर्वात उंच मुलगी म्हणून तुर्कीच्या रूमेसा गेल्गी या १७ वर्षीय मुलीची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सफरानबोलू येथे रहाणा-या रूमेसाची उंची सात फूटाहून अधिक आहे.

तिची उंची २१३.०६ सेमी (७ फूट ०९ इंच) असून, हात २४.५ सेमी आणि पाय ३०.५ सेमी लांब आहेत. रूमेसा अकरावी इयत्तेत शिकत आहे. सध्या तिला ‘वीवर सिंड्रोम’ नावाच्या आजाराने ग्रासले आहे. यामुळे तिचा शारीरिक विकास वयाच्या मानाने अधिक मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

यामुळे तिला चालता येणे अशक्य झाले आहे. तिच्यासाठी विशेष व्हीलचेयर बनवण्यात आली असून तिचे बूटही खास अमेरिकेत बनवण्यात आले आहेत.
रूमेसाला सुरुवातीला लोक हसत असत. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या उंचीकडे लक्ष केंद्रीत केले. तिला इतरांपेक्षा वेगळे दिसण्यात आवडते. उंचावर ठेवलेल्या वस्तूही ती सहज काढून घेते, यात तिला आनंद मिळतो.

रूमेसा हिला गिनीज बुक प्रमाणपत्र देण्यात आले असून तिचे नाव गिनीज बुकच्या सप्टेंबर २०१५ मध्ये प्रकाशित होणा-या आवृत्तीत येणार आहे.

Leave a Comment