एक देश असा आहे कि तिथे कुणीच राहत नाही !

country
आज जगात सर्वत्र लोकसंख्या वाढत आहे ,परिणामी राहण्यासाठी म्हणजेच घरांसाठी जागेचे क्षेत्रफळ कमी पडत आहे. अशी स्थिती असताना या पृथ्वीतलावर असे काही देश आहेत,कि ज्याची माहिती फार कमी आहे. काही देश तर व्यक्तिगत मालकीचेही आहेत. तर काही देशांचे क्षेत्रफळ असे आहे कि विश्वास बसणार नाही इतके ते छोटे आहेत. आपल्याला मोठमोठे देशच माहित आहे;पण जे देश चिमुकले आहेत,त्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. असाच एक देश रेडोंडा गणराज्य. या देशाचे चार राजे आहेत जे तिथे राहतच नाही ,मग कोण राहत असेल ,हा प्रश्न साहजिकच सर्वाना पडेल. बरोबर आहे ,या देशावर म्हणजेच छोट्या बेटावर साम्राज्य म्हणा वर्चस्व कुणाचे तर सीगल्स व शेळ्यामेंढय़ाचे. आहे कि नाही विशेष!

रेडोंडा गणराज्य हे अँटीगुआच्या नैऋत्येस असलेल्या एका छोट्याशा बेटावर असलेला देश . त्याचे क्षेत्रफळ जेमतेम एक चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. या बेटास एका देशाचा दर्जा असला तरी त्यावर कोणीही राहत नाही. गंमत म्हणजे तिथला राजाही तिथे न राहता अन्यत्र राहतो. या बेटावर सीगल्स व शेळ्यामेंढय़ाच चरताना दिसतात. या देशात कुणाचेही वास्तव्य नसले तरी त्यावर किंग लिओ- १, किंग रॉबर्ट, मॅक्स लॅगेट आणि किंग झेवियर असे चार राजे राज्य करतात.

Leave a Comment