आयएसआयएस अण्वस्त्रे बनविण्याची भीती

isis
सुन्नी दहशतवादी आयएसआयएस संघटनेने मोसुल विद्यापीठातील रिसर्च सेंटरमधून ४०० किलोग्रामची अणुसामग्री ताब्यात घेतली असल्याचे वृत्त आहे. यामुळे तज्ञांच्या सहकार्याने ते अण्वस्त्रे तयार करतील अशी भीती इराककडून व्यक्त करण्यात आली आहे.

रॉयटरतर्फे देण्यात आलेल्या बातमीनुसार आयएसआयएस संघटनेने ४०० किलोग्रॅम युरोनियम मोसुल विद्यापीठातून ताब्यात घेतले असल्यासंबंधीची पत्र इराकचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत मोहम्मद अली अलाहमिक यांनी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांना दिले आहे. हे अतिरेकी या युरोनियमचा वापर करून अण्वस्त्रे बनवितील अशी भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे तसेच संयुक्त राष्ट्राने या संदर्भात इराकला मदत करावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. अशी अण्वस्त्रे बनविली गेली तर इराकसाठी ती धोक्याची घंटा असल्याचे तसेच ही सामग्री इराकबाहेर नेण्याची भीती असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

मात्र अमेरिका सरकारच्या मते हे युरेनियम कच्चे असल्याने त्यापासून अण्वस्त्रे बनविणे आयएसआयएसला अशक्य आहे. कच्च्या युरेनियमपासून अण्वस्त्रे बनविण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असल्याचे अण्वस्त्रे बनविण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment