४४ पॅलेस्टिनी इस्रायलच्या हल्ल्यात ठार

iseral
गाझा-जेरुसलेम : गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात १७ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, त्यात महिला व मुलांची संख्या जास्त आहे. हवाई हल्ल्यात मृतांची एकूण संख्या आता ४४ झाली आहे. तर पॅलेस्टिनी संघटना हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात संपूर्ण इस्रायल सापडले आहे. दोन्ही शेजारी देशात प्रथमच मोठा संघर्ष उफाळला आहे.

इस्रायल व पॅलेस्टिन यांच्यात सामायिक असणा-या गाझा पट्टीचे दोन भाग असून, एक इस्रायलच्या ताब्यात आहे, तर दुसरा गेल्या सात वर्षापासून हमासच्या ताब्यात आहे. हमासच्या ताब्यातील गाझा पट्टीवर बुधवारचा दिवस हा नोव्हेंबर २०१२ नंतरचा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला आहे. इस्रायलने हमासचे रॉकेट हल्ले रोखण्याकरीता 118 रॉकेट प्रक्षेपकावर हल्ला केला आहे. इस्नयलच्या ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह अंतर्गत ही कारवाई सुरु आहे. हमास संघटनेने केलेल्या हल्ल्यात १८० रॉकेट्सचा मारा करण्यात आला आहे.

Leave a Comment