बहुगुणी उमराण बोर

bor
कोरडवाहू ङ्गळबागा दुष्काळी भागांचे नशीब बदलून टाकू शकतात. त्यातल्या काही बागांनी तर ते केेलेही आहे.उदाहरणार्थ पेरू. अनेक शेतकर्‍यांनी पेरूच्या बागा केल्या आहेत आणि त्यातून त्यांना चांगली अर्थप्राप्ती झाली आहे. पण बोरांची कहाणी ङ्गारच रुचकर आहे. २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बोरांच्या बागा कोणी लावेल अशी कल्पनाही केली नव्हती. कारण बोराचे झाड शेताच्या बांधावर आपोआप येते. मुद्दाम कोणी बोराचे झाड लावत नाही. कोणी तसे लावल्याचे ऐकिवातही नव्हते. आपल्या बांधावर परंपरेने चालत आलेले एखादे झाड असते. ज्याच्या शेताच्या बांधावर असे झाड असेल त्याने त्या बोराचे पैसे करावेत असा विचारही कधी केला नसेल. साधारणत: गुराखी पोरांचा त्या ङ्गळावर डोळा असायचा आणि त्यांनी गुरे चारता चारता झोडपून बोरे खायची. हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजला जात असे. शिवाय शाळा चुकवून रानोमाळ ङ्गिरणार्‍या पोरांनी तरी हा रानमेवा हक्काने खायचाच असे ठरलेेले. काही ठिकाणी भिकारी बायका बोरे झोडपून नेतात. त्या बोरांच्या बदल्यात भाकरी मागतात. असे हे भिकारणीला भाकरी देऊन खायचे ङ्गळ.

१९८० च्या सुमारास बांधावर वाढणारे हे बोराचे झाड शेतात आणून लावण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्याता कृषि अधिकारी कृषि भूषण वि.ग. राऊळ यांंनी केला. बांधावर आपल्या नकळत वाढणारे आणि आपल्याला एक पैसाही मिळवून न देणारे हे झाड शेतात लावायचे आणि त्याच्या नादी लागून आपण तेवढ्या जमिनीतले पीक वाया घालवायचे ही कल्पनाच लोकांना सहन होईना. पण श्री. राऊळ यांनी लोकांच्या शेतांपर्यंत जाऊन त्यांना हे पटवून दिले. सोलापूर जिल्ह्यातल्या काही नेत्यांना त्यांनी आधी बोरांच्या बागा लावण्यास उद्युक्त केले. त्यांना पैसा मिळायला लागला आणि त्यातूनच मग बोरांच्या बागा लागायला लागल्या. बोरांना मार्केटिंग असते आणि आपल्या राज्यातल्या बोरांना परदेशातही मागणी आहे ही गोष्ट ऐकून अनेक शेतकरी चकित झाले, पण जगभरात ही शबरीची बोरे जायला लागली. बोरांना तीन रुपये किलो भाव आला तरीही उसा एवढे पैसे मिळतात असे दिसून आले. विश्‍वासराव कचरे, ज्योतिराम गायकवाड अशा अनेक शेतकर्‍यांनी हे ङ्गळ आपल्याला ङ्गलदायी ठरू शकते असे आपल्या कष्टाने दाखवून दिले.

सोलापूर हा राज्यातला सर्वात कमी पावसाचा आणि दुष्काळी जिल्हा समजला जायचा. दुष्काळामुळे या जिल्ह्यातल्या लोकांचे मोठया शहरात ङ्गार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असे पण या बोरांच्या बागांनी चित्र बदलून टाकले आणि १९९१ च्या सुमारास सरकारने केलेल्या एका पाहणीत या जिल्ह्यातले दुष्काळामुळे होणारे स्थलांतर जवळ जवळ थांबले आहे असे दिसून आले. नंतर सोलापूर पासून प्रेरणा घेऊन अन्यही जिल्ह्यांत बोरांच्या बागा ङ्गुलायला लागल्या. आता महाराष्ट्रातून परराज्यात जाणारी ही बोरे शबरी बोरे आणि आता चमेली बोरे म्हणून नावाजली गेली आहेत.याही ङ्गळात संशोधन करून नव नव्या जाती शोधून काढण्यात आल्या आहेत. त्यातली उमराण ही जात सर्वात लोकप्रिय आहे. या जातीची बोरे गोड असतात. पण बोर हे ङ्गळ आपण गोड म्हणून खात नसतो. बोरांची एक तुरट, आंबट अशी खास चव असते. तशी शाम बेर ही एक जात शोधून काढण्यात आली आहे. काही कल्पक आणि धाडसी शेतकर्‍यांनी बोरांची विक्री करणारे स्टॉल पॅरिसमध्ये लावले होते. प्लॅस्टिकच्या जाळीच्या पिशवीत घालून ते आकर्षक केले जाते.

रानचा मेवा वनवास संपवील

सीताङ्गळ या पिकाला हे नाव का देण्यात आले आहे, असा प्रश्‍न बर्‍याच वेळा पडतो. परंतु राम आणि सीता चौदा वर्षे वनवासात गेले तेव्हा जंगलात अशाच कसल्या तरी ङ्गळांनी त्यांची गुजराण झाली असावी आणि म्हणूनच त्यातल्याच एका, या ङ्गळाला सीताङ्गळ असे नाव पडले असावे. सीताङ्गळाचे झाड अतिशय हलक्या जमिनीत चांगले येेते. आता सीताङ्गळाची शेती केली जायला लागली आहे. त्या निमित्ताने सीताङ्गळाच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्या जायला लागल्या आहेत. त्यांची मुद्दाम लागवड केली जात आहे. एकंदरीत या झाडाचे लाड सुरू झाले आहेत. परंतु अगदी आता आतापर्यंत सीताङ्गळाचे झाड कोणी मुद्दाम लावत नव्हते. चिंच किंवा बोराप्रमाणेच हे झाड कोठेतरी कोणाच्या हातून चुकून बी पडले असल्यामुळे उगवून येत होते.

बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यात डोंगराळ भागात सीताङ्गळाची झाडे विपुल प्रमाणात आलेली आहेत. ती आपोआप आलेली आहेत. हे रानमाळ सुद्धा कोणाच्या मालकीचे नाही. त्यामुळे त्या भागातले आदिवासी किंवा भूमिहीन शेतमजूर ही झाडे आपलीच समजून त्याची सीताङ्गळे तोडून ती बाजारात विक्रीत आणत असतात. सीताङ्गळांचा बाजार धारूर, आष्टी या बीड जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरतो. परंतु या बाजारांमध्ये मुद्दाम सीताङ्गळाची लागवड करून ती ङ्गळे विक्रीला आणणारे शेतकरी अगदी अपवाद म्हणावेत एवढेच असतील. बाकी बहुतेक त्या जमिनीचे मालक नसलेले भूमिहीन लोकच सीताङ्गळांची विक्री करताना दिसतात.
अलीकडे मात्र सीताङ्गळाने सर्वांची नजर वेधून घेतलेली आहे. सीताङ्गळाला पाणी ङ्गारसे लागत नाही, रोगकीडींचा उपद्रव जवळपास नाहीच आणि त्याला चोर चोरून नेत नाहीत की वाटसरू त्यांच्या वाटेला जात नाहीत. त्याचे चांगले मार्केटिंग केल्यास त्याला भरपूर पैसे मिळू शकतात.

सीताङ्गळ खायला ङ्गार गोड अ७४सते. ते कोरड्या हवामानात भरपूर उन्हात पक्व अवस्थेत येते. अशा रितीने पक्व अवस्थेत येत असताना जेवढे कडक ऊन पडेल तेवढी ङ्गळामध्ये गोडी जास्त वाढत असते. महाराष्ट्राच्या नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, सांगली या पट्ट्यामध्ये अशी हिवाळी पिके पक्व अवस्थेत येण्याच्या काळातच कडक ऊन पडते. या भागातले लोक अगदी हिवाळ्यातल्या या उन्हाने त्रस्त झालेले असतात. मोठ्या उपहासाने, या भागात दोनच ऋतू असतात. एक उन्हाळा आणि दुसरा कडक उन्हाळा, असे म्हणत असतात. परंतु ही भौगोलिक परिस्थिती किती ङ्गायद्याची आहे याची त्यांना कल्पना नाही. या विचित्र स्थितीमुळेच या भागातले द्राक्ष जगात सर्वात गोड आहेत याची कदाचित त्यांना कल्पना नसेल.

याच हवामानामध्ये डाळींब, बोर, सीताङ्गळ आणि द्राक्ष अशी पिके पक्व अवस्थेत येत असतात. त्यामुळे याही सार्‍या ङ्गळांमध्ये भरपूर साखर तयार होत असते. बीड किंवा जळगाव भागातले सीताङ्गळ खाल्ल्यानंतर हात किती चिकट होतो याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे सीताङ्गळ हे सुद्धा उपेक्षित परंतु ङ्गायदेशीर ठरणारे कोरडवाहू ङ्गळझाड ठरलेले आहे. आता आता जळगाव जिल्ह्यामध्ये ना.धों. महानोर यांनी १८० एकर केवळ सीताङ्गळे लावलेली आहेत आणि ते गुजरातमध्ये त्यांची विक्री करीत असतात. सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील नवनाथ कसपटे या शेतकर्‍याने तर सीताङ्गळावर खूप संशोधन केलेले आहे आणि लागवडही केलेली आहे. त्यामुळे त्यांना अलीकडे सीताङ्गळ सम्राट असे म्हटले जाते. एकंदरीत सीताङ्गळ हे व्यवस्थित लागवड केल्यास शेतकर्‍यांना चांगला पैसा देऊन जाते हे नक्की आहे.

Leave a Comment